लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतात फवारणीसाठी गेलेल्या शेतकर्याला विषबाधा होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे घडली. अशोक रामकृष्ण दहीभात (४८) असे मृतक शेतकर्याचे नाव आहे. अशोक दहीभात हे स्वत:च्या शेतात तुरीवर फवारणी करण्यासाठी गेले होते. फवारणीनंतर घरी परतल्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली. ही बाब त्यांच्या कुटुंबीयांना लक्षात येताच त्यांना तातडीने अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांना त्यांना तातडीने अकोला येथे हलवण्याचा सल्ला दिला. अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे प त्नी, दोन मुली, भाऊ असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे शे तकर्यांमध्ये फवारणीविषयी भीती निर्माण झाली आहे.
शेतात फवारणीसाठी गेलेल्या शेतकर्याचा विषबाधेने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 22:14 IST
अकोला : शेतात फवारणीसाठी गेलेल्या शेतकर्याला विषबाधा होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे घडली. अशोक रामकृष्ण दहीभात (४८) असे मृतक शेतकर्याचे नाव आहे.
शेतात फवारणीसाठी गेलेल्या शेतकर्याचा विषबाधेने मृत्यू
ठळक मुद्देमुंडगाव येथील घटनाअशोक रामकृष्ण दहीभात असे मृतक शेतकर्याचे नाव