मधापुरी येथे शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:37 IST2019-06-23T17:37:37+5:302019-06-23T17:37:46+5:30
कुरूम : नजीकच्या मधापुरी येथील ३८ वर्षीय शेतकऱ्यांचा राहत्या घरात सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना २३ जून रोजी घडली.गणेश बिसराम गुजर असे मृतकाचे नाव आहे.

मधापुरी येथे शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूम : नजीकच्या मधापुरी येथील ३८ वर्षीय शेतकºयाचा राहत्या घरात सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना २३ जून रोजी घडली.गणेश बिसराम गुजर असे मृतकाचे नाव आहे.
मधापुरी येथील रहिवासी गणेश बिसराम गुजर हे शेजारील मित्र विश्वनाथ श्रीकृष्ण जाधव यांच्यासह आपल्या राहत्या घरातील पडक्या खोलीत असलेल्या शेणाच्या गोवºया पोत्यामध्ये भरत होते. यावेळी त्यांच्या हाताला सापाने दंश केल्याने ते जखमी झाले.यावेळी त्यांना शेजाऱ्यांनी कुरूमच्या प्रा.आ.केंद्रात उपचाराकरिता हलविले व तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेद्वारे अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात पुढील उपचाराकरिता हलविले.परंतु वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या मृतक गणेश गुजर हा शेती करून व मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. पत्नी ममता ही आपली मोठी मुलगी प्राची हिला शिक्षणाकरिता नागपूरला आजोळी सोडून देण्याकरिता, तर धाकटी मुलगी नयना व लहान मुलगी प्राची सोबत गेली होती.घरातील कर्ता पुरुष गेल्याने गुजर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (वार्ताहर)