विद्युत तारेच्या स्पर्शाने इसमाचा मृत्यू

By Admin | Updated: December 26, 2014 00:34 IST2014-12-26T00:28:31+5:302014-12-26T00:34:18+5:30

आकोट येथील घटना.

The death of the electric star with death | विद्युत तारेच्या स्पर्शाने इसमाचा मृत्यू

विद्युत तारेच्या स्पर्शाने इसमाचा मृत्यू

आकोट : स्थानिक अकोला मार्गावरील गोकुळ कॉलनी येथे विद्युत तारेला स्पर्श होऊन एका ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना २५ डिसेंबराल सकाळी घडली.
पोलीस सूत्रानुसार, जीवन रामकृष्ण गोपनारायण (५५ रा. सती मैदान, आकोट) हे २५ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास अकोला मार्गावरील गोकुळ कॉलनी परिसरातील बोराच्या झाडाची बोरे लोखंडी सळईने पाडत होते. अशातच सळईचा स्पर्श झाडाजवळ असलेल्या विद्युत तारेला झाला. त्यामध्ये गोपनारायण विजेचा धक्का लागून जागीच गतप्राण झाले. या प्रकरणी आकोट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: The death of the electric star with death