मूर्तिजापुरात भरदिवसा घरफोडी; २.७७ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST2021-01-13T04:46:33+5:302021-01-13T04:46:33+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महाकाली नगरात राहणाऱ्या फिर्यादी वंदना ज्ञानदेव खंडारे या पती व दोन मुलांसह राहतात. सोमवारी त्या बँकेच्या ...

मूर्तिजापुरात भरदिवसा घरफोडी; २.७७ लाखांचा ऐवज लंपास
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महाकाली नगरात राहणाऱ्या फिर्यादी वंदना ज्ञानदेव खंडारे या पती व दोन मुलांसह राहतात. सोमवारी त्या बँकेच्या कामानिमित्ताने दुपारी १२ वाजता बाहेर गेल्या होत्या, तर पती व मोठा मुलगा खेड्यात असलेल्या शेतावर गेला होता. तसेच लहान मुलगा हा शाळेत गेला होता. दुपारी लहान मुलगा शाळेतून घरी परत आला तेव्हा घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. दुपारी १२ ते २ घरी कोणीच नसल्याने अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट तोडून कपाटातील सोन्याचा एक नेकलेस, गहू पोत, एक मिनी व मोठे मंगळसूत्र, कानातले तीन-चार जोड व अंगठी यासह २ लाख ४७ हजारांचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर शेतीकामासाठी घरात ठेवलेले ३० हजार रुपये नगदी, असा २ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात चोरट्यांचा तपास लावण्यासाठी श्वानपथक व फिंगर प्रिंट्स पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने अज्ञात चोरट्यांचा सुगावा घेत सोनाळा रस्त्यापर्यंत धाव घेतली; परंतु तेथून श्वान पुढे सरकले नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासंदर्भात मुर्तिजापूर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास मूर्तिजापूर पोलीस करीत आहेत. (फोटो)