मूर्तिजापूरात भरदिवसा घरफोडी;  २ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 08:00 PM2021-01-11T20:00:19+5:302021-01-11T20:05:06+5:30

Burglary in Murtijapur सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ७७ हजार  ऐवज लंपास केल्याची घटना ११ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.

Daytime burglary in Murtijapur; 2 lakh 77 thousand was stolen from Lampas | मूर्तिजापूरात भरदिवसा घरफोडी;  २ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास

मूर्तिजापूरात भरदिवसा घरफोडी;  २ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देवंदना ज्ञानदेव खंडारे या आपले पती व दोन मुलांसह राहतात.लहान मुलगा शाळेतून घरी परत आला तेव्हा घराचे कुलूप तुटलेले आढळून आले.

मूर्तिजापूर : येथील महाकाली नगरातील भरदुपारी अज्ञात चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ७७ हजार  ऐवज लंपास केल्याची घटना ११ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
            मिळालेल्या माहितीनुसार येथील महाकाली नगरात राहणाऱ्या फिर्यादी वंदना ज्ञानदेव खंडारे या आपले पती व दोन मुलांसह राहतात. घटनेच्या दिवशी त्या बँकेच्या कामानिमित्ताने दुपारी १२ वाजता बाहेर गेल्या होत्या.  तर पती व मोठा मुलगा खेड्यात असलेल्या शेतावर तर लहान मुलगा शाळेत गेला होता.  दुपारी लहान मुलगा शाळेतून घरी परत आला तेव्हा घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. दुपारी १२ ते २ घरी कोणीच नसल्याने अज्ञात चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून आतमधे प्रवेश केला, घरात असलेले कपाट चोरट्यांनी तोडले व कपाटात ठेवले सोन्याचे एक नेकलेस, गहू पोत, एक मीनी व मोठे मंगळसूत्र, कानातले तीन-चार जोड व अंगठी यासह २ लाख ४७ हजाराचे सोन्याचे दागिने त्याच बरोबर शेती कामासाठी घरात ठेवलेले ३० हजार रुपये नगदी असा २ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास केला.  अज्ञात चोरट्यांचा तपास लावण्यासाठी श्वानपथक व फिंगर प्रिंट्स पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने अज्ञात चोरट्यांचा सुगावा घेत सोनाळा रस्त्यापर्यंत धाव घेतली; परंतु तेथून चोरट्यांनी वाहनाने पळ काढला असल्याने तेथून श्वान पुढे सरकले नसल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासंदर्भात मुर्तिजापूर शहर पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.

Web Title: Daytime burglary in Murtijapur; 2 lakh 77 thousand was stolen from Lampas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.