अकोल्यात शनिवार, रविवार सुरू राहणार दस्त नाेंदणी कार्यालये

By प्रवीण खेते | Updated: May 3, 2023 17:02 IST2023-05-03T17:01:43+5:302023-05-03T17:02:46+5:30

शासनाने दस्त नोंदणीचे काम आता दर शनिवार, रविवार सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Dast Nondani offices will continue in Akola on Saturday and Sunday | अकोल्यात शनिवार, रविवार सुरू राहणार दस्त नाेंदणी कार्यालये

अकोल्यात शनिवार, रविवार सुरू राहणार दस्त नाेंदणी कार्यालये

अकोला: राज्यातील जनतेच्या सोईसाठी दस्त नोंदणी कार्यालये आता दर शनिवार आणि रविवारी सुरू ठेवण्याचे निर्देश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांनी दिले आहेत. त्यानुसार, अकोला जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-२, अकोला क्रमांक २ हे कार्यालय आता दर शनिवार रविवार सुरू राहणार आहे. 

शासनाने दस्त नोंदणीचे काम आता दर शनिवार, रविवार सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, हे कार्यालय दर बुधवार आणि गुरुवारी बंद राहणार असल्याची माहिती सहजिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विजय तेलंग यांनी दिली. या निर्णयाची अंमलबजावणी २९ एप्रिल पासून सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी घेण्याचे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी तेलंग यांनी केले आहे.

Web Title: Dast Nondani offices will continue in Akola on Saturday and Sunday

टॅग्स :Akolaअकोला