वाहतूक शाखेने काढले धोकादायक लोखंडी फलक ; सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 14:16 IST2018-05-05T14:16:09+5:302018-05-05T14:16:09+5:30
अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राष्ट्रीय महामार्गावर नेहरू पार्कनजीक वाहनचालकांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी लावण्यात आलेला लोखंडी माहिती फलक तुटल्याने हा फलक एखाद्या वाहनावर पडण्याचा धोका असतानाच वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील व कर्मचाऱ्यांनी हा फलक शुक्रवारी काढला.

वाहतूक शाखेने काढले धोकादायक लोखंडी फलक ; सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत
अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राष्ट्रीय महामार्गावर नेहरू पार्कनजीक वाहनचालकांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी लावण्यात आलेला लोखंडी माहिती फलक तुटल्याने हा फलक एखाद्या वाहनावर पडण्याचा धोका असतानाच अकोला वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील व कर्मचाऱ्यांनी हा फलक शुक्रवारी काढला. यासाठी एका मोठ्या ट्रकचे साहाय्य घेण्यात आले होते.
सार्वजिक बांधकाम विभागाने अमरावती ते खामगाव या राष्ट्रीय महामार्ग सहावर प्रमुख चौका-चौकांत वाहन चालकांच्या व नागरिकांच्या माहितीसाठी विविध फलक लावली आहेत. असाच एक लोखंडी मोठा फलक जेल चौकात महामार्गावर तुटल्याने तो लोंबकळत होता. यावेळी हवा सुटल्याने तो एका वाहनचालकाच्या अंगावर कोसळण्याचा धोका असतानाच यावेळी कर्तव्यावर असलेले शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी यांचे त्याकडे लक्ष गेले. त्यांनी समयसूचकता दाखवित तो लोखंडी फलक मोठ्या ट्रेलरच्या साहाय्याने खाली उतरविला. या धोकादायक फलकांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा फलकामुळे एखाद्या वाहन चालकाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.