शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कदायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
4
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
5
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
6
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
7
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
8
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
9
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
10
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
11
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
12
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
13
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
14
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
15
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
16
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
17
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
18
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
19
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
20
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात कोविडच्या नव्या स्ट्रेनचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:52 IST

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील मुर्तिजापूर, अकोटसह महापालिका क्षेत्रातील काही भागात कोरोनाचे नवे हाॅटस्पॉट निर्माण होऊ लागले होते, मात्र गत ...

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील मुर्तिजापूर, अकोटसह महापालिका क्षेत्रातील काही भागात कोरोनाचे नवे हाॅटस्पॉट निर्माण होऊ लागले होते, मात्र गत आठवडाभरात रुग्णवाढीचा वेग झापाट्याने वाढत गेला. अकोल्यासह शेजारच्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील कोराेनाचा कहर सुरूच आहे. दरम्यान, अमरावती येथे कोरोनाचा नवा म्युटेट स्ट्रेन असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने येथील काही कोविड रुग्णांचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी पुणे येथील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले. अकोल्यातील रुग्णांमध्येही जनुकीय बदल झालेल्या कोरोना विषाणू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी बाळगत आरोग्य विभागातर्फे गुरुवारी रात्री ७५ कोविड रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजीकडे पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचा तपासणी अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत प्राप्त होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोविड संसर्गात हा आहे बदल

पूर्वीचा कोरोना

कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला चार ते पाच दिवसानंतर लक्षणे दिसायची

सर्दी, कोरडा खोकला, धाप लागणे.

ताप येणे, ऑक्सिजनची पातळी कमी होणे.

संसर्गाचा वेग कमी

म्युटेट स्ट्रेन

कोविड रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला २४ तासांतच लक्षणे दिसायला लागतात.

सर्दी, कोरडा खोकला, धाप लागणे,

ताप येणे, ऑक्सिजनची पातळी कमी होणे.

ससर्गाचा वेग जास्त

मास्क हीच सुरक्षेची ढाल

कोरोना संसर्गाचा झपाट्याने फैलाव होत असून, नव्या स्ट्रेनचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:च्या संरक्षणासाठी सुरक्षेची ढाल म्हणून मास्कचा वापर करावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या फैलावाची गती लक्षात घेता नव्या स्ट्रेनचा धोका नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून ७५ कोविड रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही कडे पाठविण्यात आले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत तपासणीचे अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

- डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला