चमकी तापाचा राज्यातही धोका : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:09 PM2019-06-21T12:09:05+5:302019-06-21T12:09:37+5:30

चमकी तापाचा प्रसार राज्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून, इतर राज्यातून येणाºया प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे.

Danger of Chamki fever : Health Department's Neglect | चमकी तापाचा राज्यातही धोका : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

चमकी तापाचा राज्यातही धोका : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

Next

अकोला : उत्तर प्रदेशमध्ये चमकी या तापाने थैमान घातले असून, १२५ पेक्षा जास्त बालकांचा या तापामुळे बळी गेला आहे. बदलत्या हवामानासोबतच मध्यप्रदेशमार्गे राज्यात प्रवेश करणाºया प्रवाशांच्या माध्यमातून या तापाचा प्रसार राज्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून, इतर राज्यातून येणाºया प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे.
उत्तर प्रदेशात थैमान घालणारा ‘चमकी’ (कावासाकी) हा ताप प्रामुख्याने जपानमध्ये आढळणारा दुर्मिळ आजार आहे. वैद्यकीय भाषेत या तापाला एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम म्हटले जात असून, त्याला मेंदुचा तापदेखील म्हटल्या जाते. गर्मी किंवा उष्णतेच्या वातावरणात ० ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना या तापाचा सर्वाधिक धोका जाणवतो. गत महिनाभरातच उत्तर प्रदेशात या तापाचे १२५ पेक्षा जास्त बळी गेले असून, महाराष्ट्रात वसई येथे एका ८ महिन्याच्या बालकालाही या तापाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात परराज्यातून येणाºया प्रवाशांच्या माध्यमातूनदेखील हा आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परराज्यातून येणाºया विशेषत: आजारी प्रवाशांच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे; मात्र स्थानिक आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वाढती उष्णता, लांबणीवर पडलेला पाऊस अन् वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे या तापाचीही शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत सतर्कता बाळगत ० ते १५ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

लक्षणे

  • अतिताप
  • उलट्या
  • डोकेदुखी
  • उष्णतेमुळे चिडचिडपणा
  • गोंधळ
  • मान आणि पाठ दुखणे
  • मळमळ
  • बोलण्यात आणि ऐकताना त्रास होणे
  • स्मृती कमजोर होणे
  • गंभीर स्थितीत लकवा किंवा कोमात जाण्याची शक्यता


अशी आहेत कारणे

  • डोक्यात ताप गेल्याने हा आजार होतो
  • मेंदूच्या पेशी आणि नसांना सूज आल्यास मेंदूचा ताप येतो.
  • इंसेफलाइटिस बॅक्टेरिया, फुंगी, परजीवी, रसायन, टॉक्सिनमुळे देखील हा ताप होण्याची शक्यता आहे.


मेंदूत ताप गेल्याने चमकी ताप होण्याची शक्यता असते. मुख्यत: उष्णतेमुळेदेखील हा ताप होऊ शकतो. राज्यात अद्याप हा आजार पसरला नसला, तरी त्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

Web Title: Danger of Chamki fever : Health Department's Neglect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.