राणी सती मंदिरासमोर घाणीचे साम्राज्य

By Admin | Updated: August 20, 2014 00:20 IST2014-08-20T00:20:30+5:302014-08-20T00:20:30+5:30

मनपा ढिम्म; नागरिक त्रस्त

Damage Empire before the Queen Sati Temple | राणी सती मंदिरासमोर घाणीचे साम्राज्य

राणी सती मंदिरासमोर घाणीचे साम्राज्य

अकोला : गोरक्षण रोडवरील प्रभाग क्र. ३२ मधील राणी सती मंदिरासमोर नालीचे सांडपाणी साचले असून, साफसफाईअभावी कचर्‍याचे ढीग लागले आहेत. यामुळे मंदिरात येणारे भाविक व परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदन परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला दिले. प्रभाग क्र. ३२ मध्ये राणी सती मंदिरासमोरील खुल्या भूखंडावर नालीचे घाण पाणी साचले आहे. या ठिकाणी साफसफाईच होत नसल्याने घाणीसह कचर्‍याचे ढीग साचले आहेत. हा प्रकार मागील दोन महिन्यांपासून कायम असून, साफसफाईअभावी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविक भक्तांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. निवेदनावर जयप्रकाश मुरमकार, गोपाल अग्रवाल, बंडू लेहनकार, लक्ष्मीकांत अग्रवाल, गिरीश अग्रवाल, अतुल शहा आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Web Title: Damage Empire before the Queen Sati Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.