कारचा काच फोडल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST2020-12-13T04:32:53+5:302020-12-13T04:32:53+5:30

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत चांगेफळ येथे अज्ञात व्यक्तीने कारचा काच फोडून शेतातील हरभरा पिकाला पाणी देण्यासाठी ...

Damage due to broken car glass | कारचा काच फोडल्याने नुकसान

कारचा काच फोडल्याने नुकसान

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत चांगेफळ येथे अज्ञात व्यक्तीने कारचा काच फोडून शेतातील हरभरा पिकाला पाणी देण्यासाठी लावलेले स्प्रिंगलरचे प्रेशरलॉक ८ नग लंपास केल्याची घटना शुक्रवारी आणि शनिवार रोजीच्या सकाळी उघडकीस आली.

चांगेफळ येथील रहिवासी राजू चौरे हे पुणे येथे व्यवसाय करतात. ते गत काही दिवसांपूर्वी पुण्याहून गावी परतले होते. अज्ञात व्यक्तीने त्यांची एमएच १२ एनएक्स ७६२० क्रमांकाची कारचा काच गुरुवार रोजीच्या मध्यरात्री फोडला. तसेच शेतातील स्प्रिंकलरचे प्रेशरलॉक लंपास केले. या घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी दोन्ही घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणात राजू चौरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Damage due to broken car glass