दाेन गुन्हेगारांना केले दोन वर्षासाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:23 IST2021-08-20T04:23:42+5:302021-08-20T04:23:42+5:30

उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायगाव येथील रहिवासी सुभाष डिगंबर आगरकर वय ३३ वर्षे व कैलाश पांडुरंग आगरकर वय ३७ ...

Daen criminals were deported for two years | दाेन गुन्हेगारांना केले दोन वर्षासाठी हद्दपार

दाेन गुन्हेगारांना केले दोन वर्षासाठी हद्दपार

उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायगाव येथील रहिवासी सुभाष डिगंबर आगरकर वय ३३ वर्षे व कैलाश पांडुरंग आगरकर वय ३७ वर्ष हे दोघेजण जिल्ह्याच्या विविध भागात टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून दोन्ही गुन्हेगारावरील गुन्हेगारीची मालिका पाहता पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी या दोघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून उरळ पोलिसांनी या दोन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. उरळ पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात या दोघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली ; मात्र दोनही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने या दोन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हा आदेश गुरुवारी दिला असून टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे.

Web Title: Daen criminals were deported for two years