डाबकी रेल्वे गेट वाहतूकीसाठी दिवसा राहणार बंद

By रवी दामोदर | Updated: August 18, 2023 13:16 IST2023-08-18T13:15:34+5:302023-08-18T13:16:00+5:30

अकोला ते गायगाव रस्त्यावर असलेल्या डाबकी रोड स्थित रेल्वे फाटक परिसरात रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती आवश्यक आहे.

Dabki Railway Gate will remain closed for traffic during the day | डाबकी रेल्वे गेट वाहतूकीसाठी दिवसा राहणार बंद

डाबकी रेल्वे गेट वाहतूकीसाठी दिवसा राहणार बंद

अकोला : डाबकी रोड स्थित रेल्वे फाटक परिसरात रेल्वे गाड्यांच्या सुरक्षिततेसाठी ट्रॅकची दुरुस्ती आवश्यक आहे. त्यासाठी शनिवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजतापासून रविवार, दि.२० ऑगस्टच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत केवळ दिवसा रेल्वे फाटक वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तर सांयकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत रेल्वे फाटक वाहतूकीसाठी खुले असेल, अशी माहीत रेल्वे विभागामार्फत देण्यात आली आहे.

अकोला ते गायगाव रस्त्यावर असलेल्या डाबकी रोड स्थित रेल्वे फाटक परिसरात रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती आवश्यक आले. तसेच गेटच्या आतील रस्त्याचा पृष्ठभागही व्यवस्थित नसल्याने रस्त्याची स्थिती ही वाहतुकीसाठी सुरक्षित नाही. त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे रेल्वे फाटक ट्रॅक आणि रस्त्याच्या पृष्ठभागाच्या दुरुस्तीसाठी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

Web Title: Dabki Railway Gate will remain closed for traffic during the day

टॅग्स :railwayरेल्वे