हिवरखेड येथे सिलिंडरचा स्फोट; चौघे भाजले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 21:48 IST2019-04-20T21:48:13+5:302019-04-20T21:48:27+5:30
सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील चौघे जण भाजले गेले.

हिवरखेड येथे सिलिंडरचा स्फोट; चौघे भाजले!
हिवरखेड (अकोला) - सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील चौघे जण भाजल्या गेले. ही घटना हिवरखेड येथील बारगणपुरा या भागात २० एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली. चारही गंभीर जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
हिवरखेड विनोद रामदास ताळे यांच्या घरात शनिवारी सायंकाळी सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण घरात आग लागून घरात उपस्थित असलेले विनोद ताळे (३८), देवकाबाई रामदास ताळे (६०), दुर्गा विनोद ताळे (३०) आणि भक्ती विनोद ताळे (३) हे भाजल्या गेल्याने गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन चारही जखमींना तातडीने हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना अकोट येथून सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल करण्यात आले.