सायकलस्वार ठार

By Admin | Updated: March 26, 2016 02:29 IST2016-03-26T02:29:48+5:302016-03-26T02:29:48+5:30

भरधाव काळीपिवळी टॅक्सीने धडक दिल्याने वृद्ध शेतकरी जागीच ठार.

Cyclist killed | सायकलस्वार ठार

सायकलस्वार ठार

खेट्री (जि. अकोला): भरधाव काळीपिवळी टॅक्सीने धडक दिल्याने सायकलस्वार वृद्ध शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजता चान्नी-पिंपळखुटा मार्गावर चान्नी गावाजवळ घडली. चान्नी येथील शेषराव ताले (६0) हे गुरुवारी रात्री त्यांच्या शेतात सायकलद्वारे जात होते. यावेळी पिंपळखुटा येथून चान्नीकडे जात असलेल्या एम. एच. ३0 ई. ८६७७ क्रमांकाच्या काळीपिवळी टॅक्सीने शेषराव ताले यांना जोरदार धडक दिली. यात शेषराव ताले हे जागीच ठार झाले. संतोष शेषराव ताले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी काळीपिवळी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. उत्तरीय तपासणीनंतर शेषराव ताले यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Cyclist killed