निंबा फाट्यावर संचारबंदीला फासला हरताळ! नागरिकांची एसटी प्रवासात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST2021-04-16T04:18:35+5:302021-04-16T04:18:35+5:30
कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्याकरिता शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक संचारबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाची पहिल्याच दिवशी निंबा ...

निंबा फाट्यावर संचारबंदीला फासला हरताळ! नागरिकांची एसटी प्रवासात गर्दी
कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्याकरिता शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक संचारबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाची पहिल्याच दिवशी निंबा फाटा येथे ऐशीतैशी झाली. एसटी प्रवास सुरू असल्यामुळे तेल्हारा आगार, शेगांव आगार व अकोला तसेच जळगावकडे जाणाऱ्या बसेसमध्ये प्रवासी खचाखच भरलेले होते तर काही प्रवासी जागेअभावी उभे राहून प्रवास करीत होते. या प्रवाशांच्या चढ-उतारादरम्यान निंबा फाटाही गजबजलेला दिसला. अत्यावश्यक सेवा वगळता काही इतर दुकानेही उघडी होती. पोलीस आल्यानंतर काही वेळ बंद झाली. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्याकरिता शासनाने दिलेले संचारबंदी आदेशांचे तंतोतंत पालन होताना दिसले नाही. निंबा फाट्यावर पोलीस बंदोबस्त वाढवून संचारबंदीच्या आदेशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची मागणी होत आहे.