महापालिकेत भ्रष्ट्राचाराचा कळस; शासनाकडे बरखास्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:21 IST2021-02-05T06:21:06+5:302021-02-05T06:21:06+5:30
मनपात सत्तास्थानी असलेल्या भाजपच्या कालावधीत अनेक आर्थिक घाेळ चव्हाट्यावर येत आहेत. अशा प्रकरणांची चाैकशी सुरू केल्यानंतर व त्यांचे चाैकशी ...

महापालिकेत भ्रष्ट्राचाराचा कळस; शासनाकडे बरखास्तीची मागणी
मनपात सत्तास्थानी असलेल्या भाजपच्या कालावधीत अनेक आर्थिक घाेळ चव्हाट्यावर येत आहेत. अशा प्रकरणांची चाैकशी सुरू केल्यानंतर व त्यांचे चाैकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरही प्रशासनाकडून दाेषी आढळणाऱ्या व्यक्तींविराेधात कारवाई केली जात नसल्याचे दिसत आहे. भ्रष्ट्राचार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेमुळे महापालिकेत संगनमताने आर्थिक लूट केली जात असल्याचा आराेप काँग्रेसचे पदाधिकारी प्रदीप वखारिया यांनी केला. नियमबाह्यरीत्या गुंठेवारी जमिनीला मंजुरी देणे, नियम धाब्यावर बसवीत टीडीआर मंजूर करून शासनाची दिशाभूल करणे, माेबाइल टाॅवरला नियमबाह्य परवानगी देणे, ओपन स्पेसमध्ये रस्ता मंजूर करणे अशा नानाविध प्रकरणांमध्ये मनपातील आजी-माजी पदाधिकारी, मनपा अधिकारी व बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग असल्याचे वखारिया यांनी सांगितले. प्रत्येक विभागात भ्रष्ट्राचार बाेकाळला असताना त्यावर आयुक्त कारवाई करीत नाहीत. एकूणच मनपाची स्थिती अतिशय केविलवाणी असल्यामुळे राज्य शासनाकडे मनपा बरखास्त करण्याची मागणी लावून धरल्याची माहिती प्रदीप वखारिया यांनी दिली. पत्रकार परिषदेत मनपातील विराेधी पक्षनेता साजीद खान, नगरसेवक डाॅ. जिशान हुसेन, इरफान खान, माेंटू खान, माजी उपमहापाैर निखिलेश दिवेकर यांसह अनेक पदाधिकारी, कार्र्यकर्ते उपस्थित हाेते.