सोपीनाथ महाराज मंदिरात भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:23 IST2021-08-14T04:23:59+5:302021-08-14T04:23:59+5:30

दिग्रस बु : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील श्री सोपीनाथ महाराज संस्थान मंदिरात नागपंचमीचा उत्सव साजरा करण्यात आला. नागपंचमीनिमित्त ...

Crowd of devotees at Sopinath Maharaj Temple | सोपीनाथ महाराज मंदिरात भाविकांची गर्दी

सोपीनाथ महाराज मंदिरात भाविकांची गर्दी

दिग्रस बु : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील श्री सोपीनाथ महाराज संस्थान मंदिरात नागपंचमीचा उत्सव साजरा करण्यात आला. नागपंचमीनिमित्त येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मंदिर बंद असल्याने भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेतले.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोपीनाथ महाराज संस्थान विश्वस्त मंडळ, पोलिसांनी बाहेरूनच दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले होते. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या श्री सोपीनाथ महाराज संस्थानमध्ये नागपंचमीनिमित्त शेतकऱ्यांनी बैलजोडी घेऊन या मंदिराभोवती पाच फेऱ्या मारून दर्शनाचा लाभ घेतला. तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते. या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मंदिर बंद असल्याने भाविकांनी मंदिराबाहेरूनच दर्शनाचा लाभ घेतला. (फोटो)

Web Title: Crowd of devotees at Sopinath Maharaj Temple