शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

मोर्णेच्या पुराने शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 3:22 PM

हातरुण (जि. अकोला ):  दमदार पावसाने हातरुण परिसरातील मोर्णा नदी, कोळसा नाल्यांना गुरुवारी पूर आला. यामुळे नदीकाठावरील  १२५ हेकटर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली.

ठळक मुद्दे संततधार पावसाने हातरुण, दुधाळा, बोरगाव वैराळे, शिंगोली, मालवाडा, लोणाग्रा परिसरात अचानक नदी, नाल्याला पूर आला.या पूरामुळे नदी, नाल्याच्या काठावरील शेतपिकांना चांगलाच फटका बसला. मुंग, उडीद, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर पिके पाण्याखाली येऊन भूईसपाट झाली.

- संतोष गव्हाळेहातरुण (जि. अकोला ):  दमदार पावसाने हातरुण परिसरातील मोर्णा नदी, कोळसा नाल्यांना गुरुवारी पूर आला. यामुळे नदीकाठावरील  १२५ हेकटर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांचे हिरवे शिवार पूर्णत: मातीमोल झाले आहे. संततधार पावसाने हातरुण, दुधाळा, बोरगाव वैराळे, शिंगोली, मालवाडा, लोणाग्रा परिसरात अचानक नदी, नाल्याला पूर आला. या पूरामुळे नदी, नाल्याच्या काठावरील शेतपिकांना चांगलाच फटका बसला. बुधवारी झालेल्या पावसामुळे सकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले.पूर्णा नदीच्या पुराचे पाणी पिकाच्यावरून वाहत होते. या पुराने शेती अक्षरश: खरडून गेली. यासोबत मुंग, उडीद, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर पिके पाण्याखाली येऊन भूईसपाट झाली. शेतकऱ्यांनी नुकतीच कपाशी, सोयाबिन लागवड करुन खत देऊन पिकांची जोपासना केली होती. कसेबसे पीक वाढून डवरीणवर आले असताना पुरामुळे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. नदीकाठावरील शेतात मोठ्या प्रमाणात मातीचा गाळ साचल्याने पिक दिसेनासे झाले आहे. नदी,नाल्याच्या काठावर असणाऱ्या हातरुण, अंदूरा भाग एक, दुधाळा, शिंगोली, मालवाडा, अंदूरा भाग दोन शेतशिवारातील शेकडो हेक्टर शेतीला पुराचा जबरदस्त तडाखा बसल्याने पिकेच पूर्णत: भूईसपाट झाली आहेत. शेतकºयांनी पै पै गोळा करुन पिकांची लागवड केली होती. मात्र निसर्गाचा प्रकोप आल्याने शेकडो हेक्टर शेतीचे होत्याचे नव्हते झाले. यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेली शेती उपयोगी सर्वच साहित्य पुरात वाहून गेले आहे.

गावाचा संपर्क तुटला !

हातरुण येथील मोर्णा नदीच्या पुलावरून ४ फूट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पुराचे पाणी वाढत असल्याने दुधाळा आणि बोरगाव वैराळे गावाचा संपर्क तुटला आहे. 

मंदिरात नागरिकांचा मुक्काम!

मोर्णा नदीला अचानक गुरुवारी पूर आल्याने कामानिमित्त दुधाळा आणि बोरगाव वैराळे येथील नागरिक हातरुण येथील सोपीनाथ महाराज मंदिर येथे थांबलेले होते.

 

संततधार पावसाने क्षणार्थात शेकडो हेक्टर शेतातील पिके उद्ध्वस्त केली. त्यामुळे शेतकरी आर्थिक़ संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे. या नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ महसूल विभागाने पंचनामे करणे गरजेचे आहे.  - नारायणराव गव्हाणकर , माजी आमदार, बाळापूर

टॅग्स :AkolaअकोलाMorna Riverमोरणा नदी