अकोला जिल्ह्यात केवळ २६ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 10:26 IST2020-06-06T10:26:23+5:302020-06-06T10:26:40+5:30
१ लाख १५ हजार ६१९ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.

अकोला जिल्ह्यात केवळ २६ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप!
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असून, पावसाळा सुरू झाला असताना ४ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ २६ हजार ८८१ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १ लाख १५ हजार ६१९ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’च्या पृष्ठभूमीवर १ एप्रिलपासून सुरू होणारे कर्जाचे वाटप रखडले होते. २६ एप्रिलपासून जिल्ह्यात बँकांमार्फत शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. शेतकरी अडचणीत असल्याच्या परिस्थितीत पावसाळा सुरू झाला असताना, पीक कर्ज वाटपासंदर्भात निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत १ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ २६ हजार ८८१ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित १ लाख १५ हजार ६१९ शेतकºयांकडून कर्ज केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.
पेरणीची तयारी सुरू; पीक कर्ज केव्हा मिळणार?
पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात शेतकºयांनी खरीप हंगामातील पेरणीची तयारी सुरू केली असून, पेरणीसाठी लागणारे बियाणे व खते खरेदीची लगबग सुरू झाली असताना, ४ जूनपर्यंत जिल्ह्यातील केवळ २६ हजार ८८१ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पेरणीची तयारी सुरू झाली असली तरी कर्जापासून वंचित असलेल्या शेतकºयांना पीक कर्ज मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उद्दिष्ट १,१४० कोटींचे; कर्ज वाटप २६४ कोटी!
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट करण्यात आले असून, त्यापैकी आतापर्यंत जिल्ह्यातील २६ हजार ८८१ शेतकºयांना २६४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना कर्ज वाटपाचे काम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २६ हजार ८८१ शेतकºयांना २६४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
- आलोक तारेणिया
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.