अकोला जिल्ह्यात २.६८ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 10:47 AM2019-11-11T10:47:57+5:302019-11-11T10:48:08+5:30

जिल्ह्यातील किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचे ‘कवच’ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Crop insurance benefits for 2.68 lakh farmers in Akola district? | अकोला जिल्ह्यात २.६८ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ?

अकोला जिल्ह्यात २.६८ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ?

googlenewsNext

- संतोष येलकर  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात २ लाख ९८ हजार २९५ शेतकऱ्यांच्या ३ लाख ८४ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पीक विमा काढलेल्या २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांच्या २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पीक नुकसानाचाही समावेश आहे. त्यामुळे पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचे ‘कवच’ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांनी २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पिकांचा विमा काढला आहे. त्यामध्ये सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, मूग व उडीद पिकांचा विमा काढण्यात आला. पीक विमा काढलेल्या शेतकºयांकडून विमा हप्त्यापोटी (प्रीमियम) १७ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम अ‍ॅग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनीकडे जमा करण्यात आली; परंतु यावर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी पावसात खंड पडल्याने जिल्ह्यात मूग, उडिदाचे पीक बुडाले. त्यानंतर पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात कापणीला आलेले आणि कापणी झालेले सोयाबीन सडले असून, काही ठिकाणी कोंब फुटले. ज्वारी काळीभोर पडली असून, कोंब फुटले. तसेच वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक पंचनाम्यांच्या अहवालानुसार जिल्ह्यात २ लाख ९८ हजार २९५ शेतकºयांच्या ३ लाख ८४ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पीक विमा काढलेल्या २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांच्या २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पीक नुकसानाचाही समावेश आहे. पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील सर्वच शेतकºयांचे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे; परंतु पीक विमा धोरणाच्या निकषांनुसार जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळणार, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


विमा दाव्याची रक्कम ७०८ कोटी!
जिल्ह्यातील सातही तालुक्यात २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांनी २ लाख २ हजार ५३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला असून, विमा हप्त्यापोटी १७ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे जमा करण्यात आली आहे. विमा काढलेल्या शेतकºयांच्या पीक विमा दाव्याची एकूण रक्कम ७०८ कोटी ३९ लाख रुपये इतकी होते. जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकºयांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने, पीक विमा दाव्याची रक्कम शेतकºयांना मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Crop insurance benefits for 2.68 lakh farmers in Akola district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.