सराईत गुन्हेगारास देशी कट्ट्यासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 10:24 AM2021-01-20T10:24:37+5:302021-01-20T10:24:45+5:30

Akola Crime News शहरातील चार पाेलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

Criminal arrested with Pistol in Akolapi | सराईत गुन्हेगारास देशी कट्ट्यासह अटक

सराईत गुन्हेगारास देशी कट्ट्यासह अटक

Next

अकाेला : जुने शहरातील भगतवाडी येथील रहिवासी तसेच कुख्यात गुंड निमवाडी परिसरात दहशत पसरवीत असल्याच्या माहितीवरून दहशतवादविराेधी पथकाने सापळा रचून त्यास मंगळवारी अटक केली. सय्यद आसिफ सय्यद अब्बास असे आराेपीचे नाव असून त्याच्याविरुध्द शहरातील चार पाेलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

सय्यद आसिफ सय्यद अब्बास रा. भगतवाडी हा देशी कट्टा घेऊन निमवाडी परिसरातील नागरिकांना धाक दाखवून त्यांच्याकडील पैसे लुटत असल्याची माहिती दहशतवादविराेधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाेलिसांनी तातडीने धाव घेउन सापळा रचून त्यास रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून देशी कट्टा जप्त करण्यात आला आहे. सय्यद आसिफ सय्यद अब्बास याच्याविरुध्द सिटी काेतवाली पाेलीस स्टेशन, सिव्हिल लाइन्स पाेलीस स्टेशन, खदान पाेलीस स्टेशन आणि रामदास पेठ पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यावरून हा आराेपी कुख्यात असल्याचे समाेर आले आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविराेधी पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Criminal arrested with Pistol in Akolapi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.