मित्राची हत्या करणाऱ्यास न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:17 IST2021-04-06T04:17:17+5:302021-04-06T04:17:17+5:30

जुने शहरातील शिवसेना वसाहत येथील रहिवासी बाबूलाल शेळके व अमर उर्फ विकी अग्रवाल हे दोघे मित्र असून शनिवारी रात्री ...

Court custody for friend's killer | मित्राची हत्या करणाऱ्यास न्यायालयीन कोठडी

मित्राची हत्या करणाऱ्यास न्यायालयीन कोठडी

जुने शहरातील शिवसेना वसाहत येथील रहिवासी बाबूलाल शेळके व अमर उर्फ विकी अग्रवाल हे दोघे मित्र असून शनिवारी रात्री ते दोघे जण सोबत होते. यावेळी अमर व बाबूलाल या दोघांमध्ये वाद झाले. या वादातूनच अमरने बाबूलाल यांना गमतीमध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातच अमर अग्रवाल याने बाबूलाल शेळके यांच्या मानेवर जोरात लाथ मारल्याने शेळके यांचा जमिनीवर कोसळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर अमर अग्रवाल यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. रविवारी आरोपीस अटक करून रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सोमवारी आरोपी अमर अग्रवाल याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Web Title: Court custody for friend's killer