देशी दारूची वाहतूक; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 20:08 IST2017-05-31T20:08:45+5:302017-05-31T20:08:45+5:30

पातूर : पातूर शहरामधून सध्या भरदिवसा दारूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे. पातूर येथे ३१ मे रोजी पातूर पोलिसांनी पाच हजार रुपयांच्या दारूसह दोन आरोपींना अटक केली आहे.

Country liquor transportation; Both arrested | देशी दारूची वाहतूक; दोघांना अटक

देशी दारूची वाहतूक; दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : पातूर शहरामधून सध्या भरदिवसा दारूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे. पातूर येथे ३१ मे रोजी पातूर पोलिसांनी पाच हजार रुपयांच्या दारूसह दोन आरोपींना अटक केली.
तालुक्यातील बोडखा येथे दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पातूर पोलिसांनी ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ. दिनकर गुडदे, भूषण कुऱ्हेकर यांनी केलेल्या कार्यवाहीत मोटारसायकल व दारूसह दोघांना अटक करण्यात आली. सदर कारवाई बुधवारी दुपारी ३ वाजता करण्यात आली. मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील वृषभ राजू केवट व राजू चंद्रकांत साठे हे दोघे एमएच ३७ एफ ६९३९ क्रमांकाच्या मोटारसायकवरून ५,१४० रुपये किमतीच्या ८६ क्वार्टर देशी दारूची अवैध वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याजवळून ८६ क्विंटल देशी दारू व ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. हे वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Country liquor transportation; Both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.