सात उमेदवारांचे ४०९ मतमोजणी प्रतिनिधी!

By Admin | Updated: May 14, 2014 20:47 IST2014-05-14T20:20:44+5:302014-05-14T20:47:43+5:30

अकोला लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसह सात उमेदवारांमार्फत मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी ४०९ मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे.

Counting of votes for seven candidates | सात उमेदवारांचे ४०९ मतमोजणी प्रतिनिधी!

सात उमेदवारांचे ४०९ मतमोजणी प्रतिनिधी!

अकोला : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शुक्रवार, १६ मे रोजी होणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसह सात उमेदवारांमार्फत मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी ४०९ मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या १० एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवार, १६ मे रोजी होणार आहे. या पृष्ठभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजप, काँग्रेस, भारिप-बमसं, बसपा, आम आदमी पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी या राजकीय पक्षांसह एक अपक्ष अशा एकूण सात उमेदवारांमार्फत मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नेमणुकीसाठी आपापल्या कार्यकर्त्यांच्या नावांची यादी जिल्हा निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आली. त्यानुसार भाजपचे संजय धोत्रे ९०, काँग्रेसचे हिदायत पटेल ९०, भारिप-बमसंचे ॲड. प्रकाश आंबेडकर ९२, बसपाचे बी.सी.कांबळे २४, आम आदमी पार्टीचे अजय हिंगणकर २०, बहुजन मुक्ती पार्टीचे शेख हमीद इमाम ४ व अपक्ष संदीप वानखडे ८९ अशा सातही उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी म्हणून एकूण ४०९ कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेले उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी मतमोजणीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत. मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान, उमेदवारांना मिळणार्‍या मतांची आकडेवारी, आढळून येणार्‍या आक्षेपार्ह बाबी व इतर घडामोडींवर मतमोजणी प्रतिनिधींचे लक्ष राहणार आहे.

Web Title: Counting of votes for seven candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.