हातरुण येथे कापसाने भरलेल्या वाहनाला आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 20:10 IST2017-11-09T19:56:58+5:302017-11-09T20:10:29+5:30

हातरुण (अकोला): वाहनात भरलेल्या २0 क्विंटल कापसाला  अचानक आग लागल्याने वाहनासह कापूस जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या  आगीमुळे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे

cotton vehicle fire at Hathurun! | हातरुण येथे कापसाने भरलेल्या वाहनाला आग!

हातरुण येथे कापसाने भरलेल्या वाहनाला आग!

ठळक मुद्देदोन लाखांचे नुकसान २0 क्विंटल कापूस जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
हातरुण (अकोला): वाहनात भरलेल्या २0 क्विंटल कापसाला  अचानक आग लागल्याने वाहनासह कापूस जळून खाक  झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या  आगीमुळे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 
हातरुण येथील शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल यांनी शेतातील का पूस बुधवारी रात्री मालवाहू वाहन क्र. एमएच 0४ डीएस ३५३९  यामध्ये भरून ठेवला होता.  या वाहनात २0 क्विंटल कापूस हो ता. गुरुवारी सकाळी या कापूस भरलेल्या वाहनाला अचानक  आग लागल्याने मोठय़ा प्रमाणात धूर निघताना दिसून आला. या  गाडीवर असलेले टायर (स्टेपनी) आगीमुळे वर उडून टिनावर  पडले. त्यामुळे आवाज झाल्याने बाजूला राहणारा अजय गिरी  युवकाने गाडीकडे धाव घेतली असता गाडी पेटलेली दिसून  आली. अजय गिरी या युवकांसह चार ते पाच जणांनी मोठय़ा  प्रमाणात पाणी टाकून आग विझविली; मात्र या आगीत इंजीनसह  गाडी व कापूस खाक झाला. या घटनेची माहिती मिळताच हा तरुणचे तलाठी दत्तात्रय काळे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा  केला. अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या जळलेल्या गाडीचे  दीड लाखाचे व शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल यांच्या कापसाचे  ४0 हजार असे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. या  घटनास्थळाची हातरुण पोलीस चौकीचे बिट जमादार विजय  चव्हाण आणि सुरेश कुंभारे यांनी पाहणी करून तपास सुरू केला  आहे. नुकसानग्रस्त शेतकरी सुभाषचंद्र अग्रवाल, अनिल  अग्रवाल, माजी पंचायत समिती सदस्य मंजूर शाह, गजानन  नसुर्डे उपस्थित होते. 

Web Title: cotton vehicle fire at Hathurun!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.