कापूस खरेदी : पाचशे कोटी रू पयांचे चुकारे थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 18:23 IST2020-02-09T18:23:15+5:302020-02-09T18:23:20+5:30
राज्य शासनाने १८०० कोटी रू पयांची बँक गॅरटी घेतल्याने पणन महासंघाला दिलासा मिळाला आहे.

कापूस खरेदी : पाचशे कोटी रू पयांचे चुकारे थकले
अकोला : महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने यावर्षी ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असून,आतापर्र्यत १,३२५ कोटी रू पयांचे चुकारे करण्यात आले आहेत.पंरतु ५२५ कोटी रू पये थकले आहेत. राज्य शासनाने १८०० कोटी रू पयांची बँक गॅरटी घेतल्याने पणन महासंघाला दिलासा मिळाला आहे.
आधारभूत किमतीपेक्षा दर जास्त व विक्री केलेल्या कापसाची रक्कम लगेच मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली होती. यावर्षी मात्र शेतकऱ्यांनी पणन महासंघाला पसंती दिली असून, खरेदी केंद्रावर दररोज कापसाची आवक वाढत आहे. राज्यात आतापर्यंत ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.खरेदी केलेला हा कापूूस १,८५० कोटी रू पयांचा असून, शेतकºयांना त्यातील १,३२५ कोटी रू पयांचे चुकारे करण्यात आले आहेत. उर्वरित चुकारे देण्याची प्रक्रिया संथ होती.दरम्यान,उपमुख्यमंत्री अजित पवार गत आठवड्यात अमरावती दौºयावर असताना महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख तसेच संचालक मंडळ पवार यांना भेटून पणन महासंघाची माहिती दिली . शेतकºयांचे चुकारे करायचे असतील तर शासनाला बँकेची गँरटी घ्यावी लागणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले.शासनाने याची दखल घेत १८०० कोटी रू पयांची बँक गॅरंटी घेतली आहे.त्यामुळे पणन महासंघाला बॅकाकडून कर्ज मिळणे सुलभ झाले असून,लवकरच उर्वरित चुकारे केले जाणार आहेत. पणन महासंघाने यावर्षी जरी ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असला तरी भारतीय कापूस महामंडळ १५ लाख क्ंिवटलच्यावर पणन महासंघाला कमीशन देणार नाही.यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.यासंदर्भात पणन महासंघाच्या संचालक मंडळाची १२ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून, उपमुख्यमंत्री व पणन मंत्र्यानाही भेटणार आहेत.बँक गॅरंटी वाढवावी ही देखील मागणी केली जाणार असल्याचे वृत्त आहे.
‘पनण’ने यावर्षी १,८५० कोटी रू पयांचा कापूस खरेदी केला आहे.१,३२५ कोटींचे चुकारे केले आहेत.उर्वरित चुकाºयांची प्रक्रिया सुरू आहे.शासनाने बँक गॅरंटी घेतल्याने दिलासा मिळाला आहे.गँरटी वाढवून मिळावी ही मागणी करणार आहे.
- राजाभाऊ देशमुख,
अध्यक्ष,
पणन महासंघ,
अकोला.