शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

CoronaVirus : दिवसभरात तीघांचा मृत्यू, ६१ पॉझिटिव्ह, २६ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 6:32 PM

शनिवार, २९ आॅगस्ट रोजी अकोला शहर, अकोट व बाळापूर येथील तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १५१ वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवार, २९ आॅगस्ट रोजी अकोला शहर, अकोट व बाळापूर येथील तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १५१ वर गेला आहे. दिवसभरात ६१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,८३६ वर पोहचली आहे. दरम्यान, शनिवारी २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शनिवारी दिवसभरात ३३१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरत ३०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये काटखेड ता. बार्शीटाकळी येथील दोन, झोडगा ता. बार्शीटाकळी येथील दोन, मनब्दा ता. तेल्हारा येथील दोन, निंभा ता. मुर्तिजापूर येथील दोन, व्याळा येथील दोन, जीएमसी येथील दोन, निमवाडी येथील दोन, गणेश नगर येथील दोन, तर शास्त्री नगर, काटेपूर्णा ता. अकोला, महसूल कॉलनी, सिंधी कॉलनी, जवाहरनगर, जठारपेठ, डाबकी रोड, मोठी उमरी, आदर्श कॉलनी, हातरुन ता. बाळापूर, पळसो ता. अकोला, नायगाव, कान्हेरी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एक महिला, दोन पुरुषांचा मृत्यूजिल्ह्यात कोरोनाच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अकोट येथील ७० वर्षीय महिलेचा शनिवारी पहाटे रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना २५ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. दुपारी बाळापूर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना २० आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. ओझोन या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रामदास पेठ भागातील ७६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.खासगी प्रयोगशाळेचे ३२ अहवाल पॉझिटिव्हडॉ. हेडगेवार हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत घेण्यात आलेले नमुने तपासणीसाठी नागपूर येथील खासगी प्र्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यामध्ये ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.२६ जणांना डिस्चार्जशनिवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११ जणांना, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथून तीन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, तर कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून १० जण, अशा एकूण २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.५४१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,८३६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३१४४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५४१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला