CoronaVirus : मास्क, हॅन्ड सॅनिटायजरचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 14:06 IST2020-03-17T14:05:57+5:302020-03-17T14:06:16+5:30
दोन्ही वस्तुंचा सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.

CoronaVirus : मास्क, हॅन्ड सॅनिटायजरचा तुटवडा
अकोला : कोरोना आजाराच्या दहशतीने प्रत्येकाच्या मनात संशय निर्माण होत असल्याने या भयंकर आजारापासून वाचण्यासाठी मास्क अन् सॅनिटायजर मोठया प्रमाणात खरेदी करण्यात येत असल्याने या दोन्ही वस्तुंचा सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. २५ ते ३० हजार मास्क खरेदी करण्यासाठी रोजची मागणी आहे तर सॅनिटायजरही मोठ्या प्रमाणात मागण्यात येत आहे; मात्र या दोन्ही बाबींचा तुटवडा असल्याचे वास्तव आहे.
कोरोनाच्या दहशतीत शाळा महाविद्यालय बंद करण्यात आले आहेत. कार्यालय, दुकान तसेच गर्दीच्या ठिकाणी हॅन्ड सॅनिटाजयर मोठया प्रमाणात वापरण्यात येत आहे. यासोबतच हॅन्ड सॅनिटायरजचा चढाई दराने विक्री करण्यासाठी साठा करण्यात येत असल्याने बाजारात याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. तर मास्कची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने याचाही गत १५ दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. बनावट सॅनिटायजर सध्या बाजारात आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने आता मास्क व सॅनटायजरचा साठा करणाऱ्यांचा शोध सुरु केला असून, त्यांच्यावर लवकरच कारवाईचा दंडुका उगारण्यात येणार आहे.