Coronavirus : अकोलेकरांनो काळजी करू नका; काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:16 AM2020-03-17T11:16:09+5:302020-03-17T11:19:27+5:30

जिल्ह्यात कोरोनाचे दोन संशयित रुग्ण होते, त्यांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे.

Coronavirus: Don't worry ; Take care! | Coronavirus : अकोलेकरांनो काळजी करू नका; काळजी घ्या!

Coronavirus : अकोलेकरांनो काळजी करू नका; काळजी घ्या!

googlenewsNext
ठळक मुद्दे १६ जणांना वैद्यकीय तपासणीनंतर ‘होम क्वारंटिन’ ठेवण्यात आले आहे. प्रत्येक खोकला हा कोरोनाची लक्षणे असणाराच आहे असे नाही.आपल्याकडे कोणताही रुग्ण नसला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना केलीच पाहिजे.

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सध्या सर्वत्रच कोरोनाची चर्चा सुरू आहे. शिवाय, अनेकांच्या मनात त्याविषयी भीतीदेखील आहे. ऋतुबदलामुळे सर्दी, खोकला अन् तापाची लक्षणे आढळून येत आहेत; परंतु त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, प्रत्येक खोकला हा कोरोनाची लक्षणे असणाराच आहे असे नाही, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे दोन संशयित रुग्ण होते, त्यांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे तर १६ जणांना वैद्यकीय तपासणीनंतर ‘होम क्वारंटिन’ ठेवण्यात आले आहे. हे सर्वच विदेशातून अकोल्यात आले आहेत, त्यामुळे स्थानिकांनी घाबरून जाऊ नये व इतरांनाही घाबरवू नये. आपल्याकडे कोणताही रुग्ण नसला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना केलीच पाहिजे. नाहक काळजी करून सर्व समाजाला पॅनिक करण्यापेक्षा आपली, कुटुंबाची व समाजाची काळजी घेण्याची गरज आहे.


‘त्या’ रुग्णाचा संपर्क टाळा
कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतरच कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा रुग्णाच्या संपर्कात येण्यापासून टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात दाखल झालेले दोन्ही संशयीत हे निगेटीव्ह आढळल्याने धोका टळला आहे; मात्र विदेशातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात येणे टाळा. त्या व्यक्तीची तपासणी झाल्यावरच संपर्क वाढवा.


‘होम क्वारंटीन’ व्यक्तींनी ही खबरदारी घ्यावी!
अल्कोहलयुक्त हॅण्ड सॅनिटायझर किंवा साबणाने वारंवार स्वच्छ हात धुवावेत. अशा व्यक्तीने वापरलेले ताट, पाण्याचे ग्लास, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरूण, गादी तसेच इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तू घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देऊ नये.


पूर्णवेळ मास्कचा वापर
मास्क दर ६ ते ८ तासांनी बदलावा. वापरलेल्या मास्कची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.
डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरूनये.
खोकला, ताप, श्वसनाचा त्रास किंवा धाप लागणे अशी लक्षणे आढळल्यास आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.

Web Title: Coronavirus: Don't worry ; Take care!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.