शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

CoronaVirus: आणखी एकाची वैद्यकीय तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:39 PM

कझाकिस्तान येथून आलेल्या एका नागरिकाला शुक्रवारी वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदेशातून आलेल्या आणखी एका व्यक्तीने शुक्रवारी वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय गाठले. त्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्याचे नमुने घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी कझाकिस्तान येथून आलेल्या एका नागरिकाला शुक्रवारी वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले होते. या व्यक्तीची अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे आणि डॉ. मुकुंद अष्टपुत्रे यांनी तपासणी केली. तसेच पुढील १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना दिल्यात.दरम्यान, विदेशातून येणारे लोक येथे वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय गाठत आहेत; परंतु या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने त्यांना थेट बाह्यरुग्ण विभागातच रांगेत उभे राहावे लागत आहे. इतर रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने अनेकांना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘ओपीडी’ बंद; तुम्ही उद्या या!कझाकिस्तान येथून आलेल्या एका व्यक्तीला शुक्रवारी वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात आले होते; परंतु ती व्यक्ती येण्यापूर्वीच येथील बाह्यरुग्ण विभाग बंद झाला होता. वैद्यकीय तपासणीसंदर्भात त्या व्यक्तीने एका कर्मचाऱ्यास विचारले असता ‘ओपीडी बंद झाली; तुम्ही उद्या या’, असे उत्तर त्या व्यक्तीला देण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी डॉ. अष्टपुत्रे यांना माहिती दिली व त्यानंतर वैद्यकीय तपासणीस सुरुवात झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.सर्वोपचार रुग्णालयात आलेल्या एका व्यक्तीची शुक्रवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती चांगली असली, तरी विदेशातून येणाºया इतर व्यक्तींप्रमाणे त्यांनाही आवश्यक सूचना दिल्या आहेत.- डॉ. शिवहरी घोरपडे,अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला