शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

CoronaVirus in Akola : दिवसभरात एक मृत्यू; ३३ नवे पॉझिटिव्ह, ३७ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 7:02 PM

आणखी ३३ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९४३ झाली आहे.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. बुधवार, १५ जुलै रोजी या जीवघेण्या आजाराने अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९८ झाली. तसेच आणखी ३३ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १९४३ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी दिवसभरात ३१५ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २८२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी प्राप्त २६ पॉझिटिव्ह अहवालांमध्ये ११ पुरुष व १५ महिलांचा समावेश आहे. यापैकी साज जण अकोट येथील, पाच जण अकोट तालुक्यातील अकोली जहांगिर येथील, अकोल्यातील गोरक्षण रोड भागातील तीन जण, बाळापूर, मुर्तीजापूर व अकोल्यातील रजपूतपुरा भागातील प्रत्येकी दोन यांच्यासह चांदुर, बोरगाव मंजू, मोठी उमरी, मुर्तीजापूर तालुक्यातील धोत्रा शिंद आणि मुंडगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यामध्ये पाच महिला व दोन पुरुषांचा समावेश आहेत. यामध्ये रजपूतपुरा, पातूर आणि पारस येथील प्रत्येकी दोन तर अकोट येथील एकाचा समावेश आहे.

मुंडगाव येथील वृद्धाचा मृत्यूमुंडगाव येथील एका ७६ वर्षीय पुरुष रुग्णाचा बुधवार १५ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर रुग्णास १३ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती अधिकच बिघडली व बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा ९८ वर गेला आहे.

३७ जणांना डिस्चार्जबुधवारी, दिवसभरात कोविड केअर सेंटर मधून ३२, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ओझोन हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून प्रत्येकी एक, अशा ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

२१५ रुग्णांवर उपचार आतापर्यंत १६३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्या २१५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या