शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; १३ नवे पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा २६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:39 IST

१३ जणांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिव्हि आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४२८ वर गेली आहे.

ठळक मुद्देसोमवारी रात्री बाळापूर येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने मृतकांचा हीआकडा २६ झाला.सद्यस्थितीत १५१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

अकोला : कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवारी आणखी १३ जणांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिव्हि आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४२८ वर गेली आहे. दरम्यान, सोमवारी रात्री बाळापूर येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने मृतकांचा हीआकडा २६ झाला असून, सद्यस्थितीत १५१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.एप्रिल महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्यानतर मे महिन्यात कोरोनाच्या संक्रमनाने वेग घेतला असून, सोमवार, २५ मे रोजी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४१५ वर पोहचली होती. यामध्ये मंगळवारी आणखी नवीन १३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. मंगळवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून एकूण २८३ संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी २७० अहवाल निगेटिव्ह असून, उर्वरित १३ अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये १० पुरुष व तीन महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये तीन जण मलकापूर, तीन जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित प्रत्येकी नवाबपुरा, अकोट फैल, बाळापूर रोड, शिवाजी पार्क, राऊतवाडी, सतरंजपूरा,बाळापूर, पिंजर ता. बार्शीटाकळी, येथील रहिवासी असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.दरम्यान , सोमवारी रात्री एका ५६ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. तो दि.२२ मे रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल कालच पॉझिटिव्ह आला. त्याचा उपचार सुरु असताना काल मृत्यू झाल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने कळविले आहे. आतापर्यंत मृतकांची संख्या २६ झाली असून, यामध्ये एका कोरोनाबाधिताची आत्महत्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता एकूण १५१ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल-२८३पॉझिटीव्ह-१३निगेटीव्ह-२७०आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ४२८मयत-२६(२५+१) ,डिस्चार्ज- २५१दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १५१

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाBalapurबाळापूर