CoronaVirus in Akola : अकोल्यात आणखी एकाची कोरोनावर मात; रुग्णालयातून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:00 IST2020-04-27T14:57:31+5:302020-04-27T15:00:11+5:30

आता या रुग्णास १४ दिवसांसाठी घरातच पण अलगीकरणात व वैद्यकीय निरीक्षणात रहावे लागणार आहे.

CoronaVirus in Akola: Another patient corona free in Akola; Hospital leave | CoronaVirus in Akola : अकोल्यात आणखी एकाची कोरोनावर मात; रुग्णालयातून सुटी

CoronaVirus in Akola : अकोल्यात आणखी एकाची कोरोनावर मात; रुग्णालयातून सुटी

ठळक मुद्देहा रुग्ण संशयित कोरोना बाधीत म्हणुन  दि. ४ एप्रिल रोजी दाखल झाला होता. त्यावर दि.१३, दि. १९, दि.२०. दि. २३ व दि. २४ अशा चाचण्या करण्यात आल्या.समाधानकारक  अहवाल आल्याने त्यास आज घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

अकोला : शहरातील अकोट फैल भागातील २८ वर्षीय रुग्ण पूर्ण बरा झाल्याने त्यास  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आज घरी सोडण्यात आले, यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचे डॉक्टर्स व सर्व पथकाने उपस्थित राहून टाळ्या वाजवून या रुग्णाला निरोप दिला.
हा रुग्ण संशयित कोरोना बाधीत म्हणुन  दि. ४ एप्रिल रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचेवर उपचार सुरु होते. त्यावर दि.१३, दि. १९, दि.२०. दि. २३ व दि. २४ अशा चाचण्या करण्यात आल्या. त्यात समाधानकारक  अहवाल आल्याने त्यास आज घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. आज त्याला रुग्णालयातून निरोप देण्यात आला. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर  घोरपडे,  वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम तसेच उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी आदी उपस्थित होते. आता या रुग्णास १४ दिवसांसाठी घरातच पण अलगीकरणात व वैद्यकीय निरीक्षणात रहावे लागणार आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

अकोला जिल्ह्यात एकूण १७ पॉझिटीव्ह अहवाल आहेत. त्यातील दोघे मयत आहेत. उर्वरित १५ पैकी पातूर येथील रहिवासी असलेले सात जण  गुरुवारी (दि.२३) तर आज (सोमवारी) अकोट फैल येथील एक असे आठ जण पूर्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. तर आता अन्य सात जण कोवीड बाधीत म्हणून  रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Web Title: CoronaVirus in Akola: Another patient corona free in Akola; Hospital leave