CoronaVirus in Akola : आणखी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या ७४६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:00 IST2020-06-06T11:36:26+5:302020-06-06T12:00:49+5:30
शनिवार, ६ जून रोजी यामध्ये आणखी २० रुग्णांची भर पडली.

CoronaVirus in Akola : आणखी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या ७४६ वर
अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे सत्र सुरुच असून, शनिवार, ६ जून रोजी यामध्ये आणखी २० रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोना बाधितांचा एकूण आकडा ७४६ वर पोहोचला आहे. यापैकी ५०५ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आल्याने प्रत्यक्षात २०७ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शनिवारी दिली.
कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा हा फैलाव झपाट्याने वाढत आहे. परिणामी अकोला विदर्भातील ‘हॉटस्पॉट’ ठरला असून, सद्यस्थितीत विदर्भात सर्वाधिक रुग्णांची नोंद अकोल्यात करण्यात आली आहे. शनिवारी त्यात आणखी २० रुग्णांची भर पडल्याने हा आकडा ७४६ वर पोहोचला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी ८९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६९ अहवाल निगेटिव्ह आहेत. शनिवारी सकाळी प्राप्त अहवालात सात महिला व १३ पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामध्ये पाच जण सिंधी कॅम्प, पाच जण देवी खदान, काला चबुतरा येथील दोन, डाबकी रोड येथील दोन जण, तर ताज नगर, बलोदे ले आउट, हरिहर पेठ, खदान, लकडगंज माळीपूरा व लेबर कॅम्प येथील प्रत्येकी एक जण रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.