शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Akola : जीएमसीत आणखी १८० खाटा होणार आरक्षीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 10:11 IST

१८० खाटा कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देपरिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे.मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांची वाढती संख्या चिंताजकन आहे. परिस्थितीशी लढा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वोपचार रुग्णालयात आणखी १८० खाटा कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी नेत्र व त्वचा वार्ड कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांसाठी अधिग्रहीत करण्यात आला आहे.परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून, हळूहळू सर्वोपचार रुग्णालयातील विलगीकरण कक्षाची संख्या वाढविण्याची तयारी सुरू आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यास सर्वोपचार रुग्णालयात ४५० खाटांचे, तर ५० व्हेंटीलेटरचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार, खाटांची संख्या वाढविण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. यापूर्वीच नेत्र व त्वचा विभागातील प्रत्येकी २० खाटांचे दोन वार्ड कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांसाठी आरक्षीत करण्यात आला आहे. त्यामध्ये संधिग्ध रुग्णांनाही ठेवण्यात आले आहे. परंतु, गत आठवड्यात दाखल संधिग्ध रुग्णांची संख्यापाहता खाटाही वाढविण्यात येणार आहे. त्यानुसार, सवोपचार रुग्णालयात आणखी १८० खाटा आरक्षीत करण्यात येणार असून, आगामी सात दिवसात हे काम पूर्णत्वास येणार असल्याची माहिती आहे. यासोबतच आगामी काळात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातील जवळपास २०० डॉक्टर्स, परिचारीका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीही यासाठी मदत घेतली जाणार असल्याची माहिती आहे.मुर्तिजापूर येथेही ५० खाटा राखीव

प्रामुख्याने कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षातच दाखल केले जाते. परंतु, ग्रामीण भागात रुग्ण आढळल्यास ग्रामीण रुग्णालयातही तशी व्यवस्था आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

चार व्हेंटीलेटरची प्रतीक्षा कायम!

सध्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात १७ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नसल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु, रुग्णांची संख्या वाढल्यास व्हेंटीलेटरची आवश्यकता भासणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे चार नवीन व्हेंटीलेटरची मागणी प्रशासनाकडे केली होती. परंतु, अद्यापही नवीन व्हेंटीलेटर प्राप्त झाले नाहीत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय