CoronaVirus in Akola : दिवसभरात १५ रुग्ण वाढले; २६ बरे झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 18:38 IST2020-07-31T18:38:11+5:302020-07-31T18:38:25+5:30

शुक्रवार, २९ जुलै रोजी ’आरटीपीसीआर’ चाचण्यांमध्ये १५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

CoronaVirus in Akola: 15 patients increased in a day; 26 Healed | CoronaVirus in Akola : दिवसभरात १५ रुग्ण वाढले; २६ बरे झाले

CoronaVirus in Akola : दिवसभरात १५ रुग्ण वाढले; २६ बरे झाले

अकोला : गत चार महिन्यांपासून ठाण मांडून बसलेल्या कोरोनाचा कोरानाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, दिवसागणिक या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शुक्रवार, २९ जुलै रोजी ’आरटीपीसीआर’ चाचण्यांमध्ये १५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळै जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २६२३ वर गेली आहे. दरम्यान, दिवसभरात २६ जण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. सद्यस्थितीत ४२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
पश्चिम विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी ओळख झालेल्या अकोल्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे ३२८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सकाळी चार पुरुष व एक महिला अशा पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये सिंधी कॅम्प, न्यू भिम नगर, जठारपेठ, मुर्तिजापर व माना येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी पाच महिला व पाच पुरुष अशा एकूण दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये अकोट येथील सहा जणांसह दहीहांडा येथील तीघे, जवाहर नगर अकबरी प्लॉट, अकोला येथील एकाचा समावेश आहे.

२६ जण कोरोनामुक्त
शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११ जणांना तर कोविड केअर सेंटर अकोला येथून १५ जणांना अशा एकूण २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४२२ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २०९६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

Web Title: CoronaVirus in Akola: 15 patients increased in a day; 26 Healed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.