CoronaVirus in Akola : आणखी १५  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:15 IST2020-10-27T12:14:58+5:302020-10-27T12:15:04+5:30

CoronaVirus, Akola News १५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,२८५ झाली आहे.  

Coronavirus in Akola: 15 more corona positive patients found | CoronaVirus in Akola : आणखी १५  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

CoronaVirus in Akola : आणखी १५  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून, मंगळवार, २७ आॅक्टोबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,२८५ झाली आहे.  
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १०७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील तीन, तेल्हारा, जवाहर नगर, बाळापूर व साखरविरा ता. बार्शिटाकळी येथील प्रत्येकी दोन,  ज्ञानेश्वर नगर,  राऊतवाडी, रामदासपेठ व जोगळेकर प्लॉट  येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. 

 ५१२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,२८० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,४९९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २७४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत  ५१२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 

Web Title: Coronavirus in Akola: 15 more corona positive patients found