शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

CoronaVirus : ग्रामीण भागात ७९५ प्रवासी ‘क्वारंटीन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 17:02 IST

दैनंदिन प्रवासी दाखलच होत असल्याने त्यांची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात एकुण २०,६४३ प्रवासी दाखल झाले आहेत. १९,८४८ जणांचा ‘क्वारंटीन’ कालावधी संपुष्टात आला आहे.७९५ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

अकोला : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाउननंतरही जिल्ह्यात प्रवाशांचा ओघ सुरूच आहे. २५ एप्रिल रोजीही जिल्ह्यात १११ प्रवासी दाखल झाले. त्यांची तपासणी करण्यात आली. या दिवसापर्यंत जिल्ह्यात एकुण २०,६४३ प्रवासी दाखल झाले आहेत. त्यापैकी १९,८४८ जणांचा ‘क्वारंटीन’ कालावधी संपुष्टात आला आहे. ७९५ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरच कोरोना प्रसाराचा धोका थांबणार आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो लोक कामानिमित्त देश, राज्यातील विविध शहरांमध्ये होते. त्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी न राहता हजारो लोकांनी अकोला जिल्ह्यातील मूळ गावाकडे धाव घेतली. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती वाढतच गेली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये २२ मार्चपासून दैनंदिन येणाºया प्रवाशांचीही तपासणी करण्यात आली. २५ एप्रिलपर्यंत दाखल झालेल्यांपैकी सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पुढील उपचाराची गरज असलेल्या तसेच संदिग्ध म्हणून २२६ व्यक्तींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. बाहेर जिल्ह्यातून दाखल झाल्याने घरातच ‘क्वारंटीन’ केलेल्या सर्व प्रवाशांची संख्या २५ एप्रिलपर्यंत २०,६४३ एवढी झाली. त्यापैकी १९,८४८ प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी समाप्त झाला आहे. आता ७९५ प्रवासी ‘क्वारंटीन’ आहेत. दैनंदिन प्रवासी दाखलच होत असल्याने त्यांची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. लॉकडाउनच्या काळातही प्रवासी येत असल्याने त्यांचा प्रवास कसा होत आहे, ही बाब आता शोधाची झाली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या