शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Coronavirus : अकोल्यात ५० खाटांचे ‘क्वारंटीन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:13 AM

कोरोनावर नियंत्रणासाठी विदेशातून येणाºया प्रत्येक व्यक्तीवर आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवणार आहे.

- प्रवीण खेते  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. विदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आता आरोग्य विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यानुषंगाने अकोल्यात ५० खाटांच्या ‘क्वारंटीन’ची व्यवस्था केली जाणार आहे.इतर देशांप्रमाणेच भारतातही कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा संसर्ग हा मुख्यत: विदेशातून आलेल्या नागरिकांद्वारे होऊशकतो.यावर नियंत्रणासाठी विदेशातून येणाºया प्रत्येक व्यक्तीवर आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवणार आहे. त्या दृष्टिकोनातून अकोल्यात ५० खाटांच्या ‘क्वारंटीन’ची व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणी विदेशातून येणाºया प्रत्येक व्यक्तीला किमान १४ दिवस वैद्यकीय अधिकाºयाच्या निगराणीत ठेवण्यात येणार आहे.

शासकीय अध्यापक महाविद्यालयाची केली पाहणीआरोग्य यंत्रणा ‘क्वारंटीन’साठी जागेच्या शोधात आहे. सोमवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एका पथकाने शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या वसतिगृहाची पाहणी केली. येथील वसतिगृहातील बहुतांश खोल्या खाली असल्याने त्याचा उपयोग ‘क्वारंटीन’साठी करण्याचे विचाराधीन आहे.

काय आहे ‘क्वारंटीन’?विदेशातून येणाºया व्यक्तींकडून कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना आरोग्य यंत्रणा १४ दिवसांच्या वैद्यकीय निगराणीत ठेवणार आहे. त्यासाठी अशा व्यक्तींना लोकवस्तीपासून स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी त्यांच्यावर कुठलेही निर्बंध लावण्यात येणार नाहीत; परंतु त्यांना परिसरातून बाहेर जाता येणार नाही. आरोग्य विभागाकडून त्यांना पोषण आहार दिला जाईल. तसेच नियमित व्यायाम करून घेण्यात येईल. या १४ दिवसांत निगराणीतील व्यक्ती आजारी पडल्यास त्याला कोरोना आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात येईल.

कोरोनामुळे काही देशात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या देशातून भारतात येणाºया लोकांची संख्याही वाढत आहे. अकोल्यातही काही लोक विदेशातून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सतर्कता म्हणून विदेशातून आलेल्या व्यक्तींना निगराणीत ठेवण्यासाठी अकोल्यात ५० खाटांच्या ‘क्वारंटीन’ची व्यवस्था केली जात आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

टॅग्स :corona virusकोरोनाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला