मूर्तिजापुरात स्वातंत्र्यदिनी कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:25 IST2021-08-17T04:25:11+5:302021-08-17T04:25:11+5:30

उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आमदार हरिश पिंपळे, तहसीलदार प्रदीप पवार, पुरवठा अधिकारी चैताली यादव, नगराध्यक्षा ...

Coronation warriors honored on Independence Day at Murtijapur | मूर्तिजापुरात स्वातंत्र्यदिनी कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

मूर्तिजापुरात स्वातंत्र्यदिनी कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आमदार हरिश पिंपळे, तहसीलदार प्रदीप पवार, पुरवठा अधिकारी चैताली यादव, नगराध्यक्षा मोनाली गावंडे, उपनगराध्यक्ष प्रशांत डाबेराव, ज्येष्ठ पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर, बीडीओ बाळासाहेब बायस, पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी अभिजित बन्नोरे, बीईओ संजय मोरे, नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे, सचिन देशमुख, संदीप जळमकर, चंदन अग्रवाल मंचावर उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर कोरोनायोद्ध्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन मोहंमद इब्राहीम अली यांनी केले.

पंचायत समितीत सभापती ऊर्मिला डाबेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार मोहन पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात तहसीलदार प्रदीप पवार यांनी ध्वजारोहण केले.

नगरपालिकेत नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे यांच्या हस्ते, आमदार हरीश पिंपळे व सर्व नगरसेवक तसेच शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी आमदार ॲड. भय्यासाहेब तिडके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

Web Title: Coronation warriors honored on Independence Day at Murtijapur