शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

कोरोनाचा धसका: गर्दी टाळण्यासाठी साखरपुड्यातच उरकला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 7:35 PM

कोरोनाचा धसका: गर्दी टाळण्यासाठी साखरपुड्यातच उरकला विवाह

- संतोष गव्हाळे

हातरुण (अकोला) : चीनमधील कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विवाह सोहळ्याला नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा भाग म्हणून होणारी विवाह सोहळ्यातील गर्दी टाळण्याकरिता रविवारी अश्विनी आणि मनोज यांनी आदर्श विवाह करून समाजाला एक आगळावेगळा संदेश दिला आहे.       बाळापूर तालुक्यातील सस्ती येथील रघुनाथ राऊत यांची मुलगी अश्विनी यांना पाहण्यासाठी खामगाव येथील भागवत सुलतान व त्यांचा मुलगा मनोज आले होते. मुलगी पाहण्याच्या कर्यक्रमात एकमेकांची पसंती झाली आणि मुलगी पाहताच आपल्याला कशाचीदेखील अपेक्षा नसून आपण लगेच साखरपुडा करून घेऊन असे काही पाहुण्यांनी सांगितले. त्यांनतर साखरपुड्याची तयारी सुरू झाली. कोरोना विषाणूमुळे सध्या भीतीचे वातावरण पसरले असून शासनाने शाळा, महाविद्यालये, जत्रा आणि यात्रा व चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. विवाह सोहळा आयोजित केल्यास मोठी गर्दी होणार आहे अशावेळी एखादा कोरोना संशयित रुग्ण विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूबाबत खबरदारी म्हणून दोन्ही कडील मंडळी सोबत बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी चर्चा केली. त्यानंतर साध्या पद्धतीने मनोज सुलतान आणि अश्विनी राऊत विवाह बंधनात अडकले. सध्या उपवर मुला-मुलींसाठी स्थळ पाहण्याचे काम चालू असून लग्नसराई सुरू झाली आहे. बराच काळ विवाह जमवण्यात तसेच विवाहाचे नियोजन करण्यात दिवस जातात. सोयरीक पुस्तकेतून माहिती घेऊन सुलतान व राऊत परिवाराने  मुला व मुलीच्या पसंतीने आदर्श लग्न लावून दिले. हा विवाह सोहळा अकोला येथे घरघूती स्वरूपात रविवारी दुपारी पार पडला.      बीई झालेले नवरदेव मनोज सुलतान आणि बी. सी. ए. झालेली अश्विनी राऊत दोघेही पुणे येथे नामांकित कंपनीत नोकरीला आहेत. कोरोना विषाणू पासून खबरदारीचा उपाय म्हणून दोघांनीही आदर्श लग्न करून नवा आदर्श निर्माण केला आहे.

आजच्या विज्ञान युगातील हायटेक जमान्यात सोशल मीडियातून कोरोना विषाणू बद्दल मोठ्या प्रमाणात माहितीची देवाण आणि घेवाण होत आहे. लग्न सोहळ्यास एखादा कोरोना संशयित रुग्ण उपस्थित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जागरूकता म्हणून साध्या पद्धतीने मनोज व अश्विनीचा विवाह झाला. विशेष म्हणजे हा विवाह जुळवण्यात कोणीही मध्यस्थ नाही.       

-  नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, बाळापूर.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस