शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

Corona Warrior : चिमुकले घरी; आई-वडील बजावताहेत कोविड वॉर्डात सेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:00 AM

कोरोनाच्या संकटकाळात दोघे पती, पत्नी स्वत:चा जीव धोक्यात घालून घरापासून, मुलांपासून लांब राहून कर्तव्यनिष्ठेचे पालन करीत आहेत.

- नितीन गव्हाळे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: घरात दोन चिमुकली मुले, आईवडील दोघेही रुग्णसेवेत. दोन महिन्यांपासून पती, पत्नी दोघेही सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वार्डात सेवा देत आहेत. दोन महिने झाले मुलांची भेट नाही. कोरोनाच्या संकटकाळात दोघे पती, पत्नी स्वत:चा जीव धोक्यात घालून घरापासून, मुलांपासून लांब राहून कर्तव्यनिष्ठेचे पालन करीत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या कक्षात सेवा देत आहेत.पातूर येथे राहणारे अनूप रमेश तायडे हे आरोग्यसेवक असून, त्यांची पत्नी संध्या अनूप तायडे या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका आहेत. त्यांना तुषार व आदित्य ही दोन लहान मुले आहेत. तुषार सातवीत शिकतो तर आदित्य हा चौथीत शिकतो. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच काही थांबले आहे. या अशा संकटकाळात जीव धोक्यात घालून रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, परिचारिका, अधिपरिचारिका, डॉक्टरांना कुटुंबापासून दूर राहून सेवा द्यावी लागत आहे. त्यापैकीच एक तायडे दाम्पत्य आहे. दोन महिन्यांपासून कुटुंबापासून, मुलांपासून दूर राहून हे पती, पत्नी प्रामाणिकपणे कोविड वार्डात कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देत आहेत. कोविड वार्डात कार्यरत असल्यामुळे त्यांना घरीही जायला मिळत नाही. मुलांची आठवण येते. त्यांना भेटावेसे वाटते; परंतु भेटता येत नाही. मुलेसुद्धा आई-वडिलांच्या भेटीसाठी आसुसलेले आहेत. आई-वडिलांना भेटण्याचा ते हट्ट करतात; परंतु त्यांची कशीबशी समजूत घालण्यात येते. एवढेच नाही तर अनूप तायडे यांच्या तीन बहिणी प्रीती, स्मिता व कीर्ती या तिघीसुद्धा अमरावती येथील रुग्णालयांमध्ये सेवा देत आहेत. मोठी बहीण प्रीती तायडे ही सुपर हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहे. स्मिता तायडे ही इर्विन हॉस्पिटलमध्ये तर लहान बहीण कीर्ती ही पीडीएमसी रुग्णालयातील कोविड वार्डांमध्ये सेवा देत आहे. अख्खं कुटुंबच कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत गुंतले आहे. 

चिमुकल्यांना सोडून बहिणीची रुग्णसेवा!अनुप तायडे यांची मोठी बहिण प्रीती तायडे ही अमरावतीतील सुपर हॉस्पिटलमधील कोविड वार्डात सेवा देत आहे. तिला अर्णव आणि अद्विका ही दोन मुले आहेत. या लहानग्यांना सोडून दोन महिन्यांपासून ही माउलीसुद्धा कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करीत आहे.

आजी करतेय मुलांचा सांभाळ!अनुप व संध्या तायडे यांना तुषार व आदित्य ही लहान मुले आहेत. त्यांना सोडून पती, पत्नी कोविड वार्डात सेवा बजावत आहेत.त्यामुळे या मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आजी लता तायडे यांच्यावर आली आहे.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या