कोरोना पुन्हा तोंड वर काढतोय; अकाेल्यात आणखी ‘चार पॉझिटीव्ह’

By राजेश शेगोकार | Updated: April 7, 2023 18:33 IST2023-04-07T18:33:27+5:302023-04-07T18:33:49+5:30

हे रुग्ण मुर्तिजापूर येथील एक तर उर्वरित तीन जण बार्शीटाकळी तालुक्यातील रहिवाशी आहे

Corona is raising its face again; Four more positives in Akola | कोरोना पुन्हा तोंड वर काढतोय; अकाेल्यात आणखी ‘चार पॉझिटीव्ह’

कोरोना पुन्हा तोंड वर काढतोय; अकाेल्यात आणखी ‘चार पॉझिटीव्ह’

राजेश शेगाेकार   

अकोला :  आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 66 जणांचा अहवाल प्राप्त झाले. त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय मार्फत कळविण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एम महिला व तीन पुरुषांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर येथील एक तर उर्वरित तीन जण बार्शीटाकळी तालुक्यातील रहिवाशी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘41’

जिल्ह्यात  सद्यस्थितीत जिल्ह्यात 41 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सात रुग्ण रुग्णालयात दाखल असून उर्वरीत 34 जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.

Web Title: Corona is raising its face again; Four more positives in Akola