मनोरुग्णांना कोरोनाचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:51+5:302021-02-05T06:18:51+5:30

जीएमसीत मनोरुग्णांसाठी वॉर्डच नाही सर्वोपचार रुग्णालयात मनोरुग्णांसाठी २० खाटांचा वॉर्ड आहे. परंतु, तो कोविडसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ...

Corona hits psychiatrists! | मनोरुग्णांना कोरोनाचा फटका!

मनोरुग्णांना कोरोनाचा फटका!

जीएमसीत मनोरुग्णांसाठी वॉर्डच नाही

सर्वोपचार रुग्णालयात मनोरुग्णांसाठी २० खाटांचा वॉर्ड आहे. परंतु, तो कोविडसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्यातरी पर्यायी व्यवस्था म्हणून सर्वोपचार रुग्णालयात मनोरुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू नसल्याची माहिती आहे. कोराेना काळापूर्वी येथील मनोरुग्ण वॉर्डात सरासरी १० ते १२ रुग्ण राहायचे. कोरोनामुळे सर्वोपचार रुग्णालयात एकही मनोरुग्ण दाखल नसल्याची माहिती आहे. सर्वोपचार रुग्णालयात मनोरुग्णांसाठी केवळ ओपीडी सुरू असून, गंभीर रुग्णांना थेट नागपूर येथे संदर्भित करण्यात येत आहे. त्यामुळे सध्यातरी सर्वोपचार रुग्णालयात एकही रुग्ण दाखल नाही.

मनोरुग्णांमध्ये कुठला त्रास वाढला?

रुग्णालयात गेल्यावर आपल्यालाही कोरोना होईल, या भीतीमुळे डिस्चार्ज मिळालेल्या मनोरुग्णांमध्ये चिंता रोग वाढल्याचे समोर आले. याशिवाय, उच्च रक्तदाब, नैराश्यामध्येही वाढ झाल्याचे चित्र दिसून आले. मनोरुग्णांसोबतच ओरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही चिंता रोगाचे लक्षणे दिसून आल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्वत: कोरोना वॉर्डात कार्यरत असल्याने आपल्याला कोरोना तर नाही होईल ना, आपल्यापासून इतरांना कुटुंबातील सदस्यांना संसर्ग होईल नाही ना, असे अनेक विचार वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्येही येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

कोरोनाकाळात सर्वसामान्यांसोबतच मनोरुग्णांच्या मानसिक आरोग्याला फटका बसला. या काळात बरे झालेल्या मनोरुग्णांमध्ये चिंता रोग वाढल्याचे दिसून आले. कोरोनाच्या भीतीने अनेकांनी रुग्णालयात येणे टाळल्याने त्यांच्या औषधोपचारात खंड पडला. त्यामुळे काही रुग्णांमधील जुने आजार पुन्हा वाढू लागले होते. सध्या अशा मनोरुग्णांवर योग्य उपचार सुरू असल्याने त्यांची मानसिक आरोग्यात सुधारणा येत आहे. - डॉ. मनीष ताले, सहायक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अकोला

Web Title: Corona hits psychiatrists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.