कोरोना संकट: गरिबांना मिळणार मोफत गहू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:10 AM2020-07-14T10:10:12+5:302020-07-14T10:10:22+5:30

प्रत्येक लाभार्थीला ३ किलो गहू आणि २ किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.

Corona crisis: Free wheat for the poor! | कोरोना संकट: गरिबांना मिळणार मोफत गहू!

कोरोना संकट: गरिबांना मिळणार मोफत गहू!

Next

- संतोष येलकर  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत यापूर्वी राज्यातील प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रतिमहा प्रत्येकी ५ किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात येत होते. १० जुलै रोजी शासनाच्या पुरवठा विभागामार्फत देण्यात आलेल्या आदेशानुसार आता राज्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत तांदळासोबतच गहू मोफत मिळणार आहे. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला ३ किलो गहू आणि २ किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना गत एप्रिल ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीस ५ किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १० जुलै रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र लाभार्थींसाठी जुलै ते सप्टेबर या कालावधीत मोफत धान्य वितरित करण्याकरिता अन्नधान्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये राज्यातील प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीला ३ किलो गहू आणि २ कलो तांदळाचे मोेफत वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत तांदळासोबतच आता गहू मोफत मिळणार आहे.


सात कोटी लाभार्थींना मिळणार मोफत धान्याचा लाभ!
राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक ७ कोटी १६ हजार ३७९ लाभार्थींना प्रत्येकी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ इत्यादी अन्नधान्याचा मोफत लाभ मिळणार आहे. त्यामध्ये प्राधान्य गटातील ५ कोटी ९२ लाख १६ हजार ३१ लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजनेतील १ कोटी ८० हजार ३४८ लाभार्थींचा समावेश आहे.


प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यातील १२ लाख ६३ हजार ५९४ लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येकी ३ किलो गहू व २ किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
- बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Corona crisis: Free wheat for the poor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.