Corona Cases : ४८ तासांत पाच जणांचा मृत्यू, २४४ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 06:39 PM2021-03-30T18:39:24+5:302021-03-30T18:39:30+5:30

CoronaVirus in Akola कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ४५१ झाला आहे.

Corona Cases : Five deaths in 48 hours, 244 new positives | Corona Cases : ४८ तासांत पाच जणांचा मृत्यू, २४४ नवे पॉझिटिव्ह

Corona Cases : ४८ तासांत पाच जणांचा मृत्यू, २४४ नवे पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख उंचावतच असून, गत ४८ तासांत कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ४५१ झाला आहे. गत दोन दिवसांत २४४ (आरटीपीसीआर ११७, रॅपीड ॲन्टिजेन १२७) नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामुळे आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा २७,४४४ वर पोहोचला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवार व मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६४२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ११७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. तर उर्वरित ५२५ जण निगेटिव्ह आहेत. गत दोन दिवसांत १९०२ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

 

दोन महिला, तीन पुरुषांचा मृत्यू

कोरोनावर उपचार घेत असलेल्या वाशिम बायपास, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. रामदासपेठ, अकोला येथील ६८ वर्षीय पुरुष, मनोरथ कॉलनी डाबकी रोड, अकोला येथील ४५ वर्षीय महिला व मोठी उमरी येथील २७ वर्षीय महिला अशा तीन रुग्णांचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. सोमवारी लहान उमरी, अकोला येथील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

४१४ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ७०, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, उम्मत हॉस्पीटल सोनोरी येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील एक, हारमोनी हॉस्पीटल येथील तीन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, नवजीवन हॉस्पीटल येथील नऊ, ओझोन हॉस्पीटल येथील चार, आर्युवेदिक महाविद्यालयातून सहा, कोविड केअर सेंटर अकोट येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील एक, इंद्रा हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन येथील २८६ अशा एकूण ४१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६,३१९ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७,४४४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २०,६७४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४५१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,३१९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

सोमवारी या भागात आढळले रुग्ण

रामदासपेठ येथील सात, जठारपेठ व अकोट येथील प्रत्येकी पाच, कौलखेड, वाशिम बायपास, मोठी उमरी, आसरामाता कॉलनी येथील प्रत्येकी तीन, राधाकिसन समोर, बार्शीटाकळी, वसंत टॉकीज, शास्त्री नगर, तापडीयानगर व तेल्हारा येथील प्रत्येकी दोन, जूने शहर, बाबुळगाव, हनुमान नगर, सिव्हील लाईन पोलिस स्टेशन, जामनेर, गोरक्षण रोड, नयागाव, आळसी प्लॉट, हिंगणारोड, येवलखेड, ज्योती नगर, खडकी, बाळापूर नाका, बिर्लाराम मंदिर, तळेगाव बाजार, शिवर, पंचशिल नगर, जीएमसी, सिंधी कॅम्प, राऊतवाडी, पातूर, वणी रंभापूर, बाळापूर, लहरिया नगर, सिंधखेड मोरेश्वर, बोरगाव मंजू व हरिहरपेठ येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

मंगळवारी या भागात आढळले रुग्ण

बार्शीटाकळी येथील चार, मुर्तिजापूर, मोठी उमरी व अकोट येथील प्रत्येकी तीन, शास्त्री नगर, मलकापूर, कौलखेड, रणपिसे नगर, महान, सिंधी कॅम्प व पारस येथील प्रत्येकी दोन, वाडेगाव, रामधन प्लॉट, हिंगणा रोड, उगवा, डाबकी रोड, सहकार नगर, खडकी, तुकाराम चौक, आदर्श कॉलनी, जीएमसी, गीता नगर, शेलू बोंडे, रुद्रायणी, पातूर, पत्रकार कॉलनी, तेल्हारा, बेलूरा, रामदासपेठ, वाशिम बायपास, कॉग्रेस नगर, हिवरा व निंबा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

Web Title: Corona Cases : Five deaths in 48 hours, 244 new positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.