Corona Cases in Akola : आणखी सहा जणांचा मृत्यू, १२० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 18:35 IST2021-06-05T18:35:30+5:302021-06-05T18:35:37+5:30
Corona Cases in Akola: शनिवार, ५ जून रोजी आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळीचा आकडा १,१०१ वर पोहोचला आहे.

Corona Cases in Akola : आणखी सहा जणांचा मृत्यू, १२० पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख घसरत असला, तरी मृत्युसत्र सुरुच असून, शनिवार, ५ जून रोजी आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळीचा आकडा १,१०१ वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८४, तर रॅपिड ॲंटिजन चाचण्यांमध्ये ३६ असे एकूण १२० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ५६,५११ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,०६० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९७६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अकोली जहागीर ता.अकोट येथील ४७ वर्षीय पुरुष, आलेगाव ता. पातूर येथील ४७ वर्षीय महिला, मुर्तिजापूर येथील ४५ वर्षीय महिला, उमरा ता. पातूर येथील ७३ वर्षीय महिला, कान्हेरी गवळी ता. बाळापूर येथील ६५ वर्षीय पुरुष व ८० वर्षीय अज्ञात पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापुर-दोन, अकोट-२७, बाळापूर-नऊ, बार्शीटाकळी- दोन, पातूर-तीन, तेल्हारा-सात अकोला-३४. (अकोला ग्रामीण-१७, अकोला मनपा क्षेत्र-१७)
४५४ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९, खासगी कोविड रुग्णालयांमधील २५, तर होम आयसोलेशन मधील ४१० अशा एकूण ४५४ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.
३,०३६ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५६,५११ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५२,३७४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१०१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३,०३६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.