Coronavirus: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात कोरोनाची लाट पूर्णपणे नियंत्रणात, दिवसभरात सापडला केवळ एक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 22:11 IST2021-07-12T18:41:40+5:302021-07-12T22:11:53+5:30
Corona cases in Akola: जिल्हाभरात करण्यात आलेल्या ४४९ चाचण्यांमध्ये केवळ एक पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली.

Coronavirus: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात कोरोनाची लाट पूर्णपणे नियंत्रणात, दिवसभरात सापडला केवळ एक रुग्ण
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाला ब्रेक लागला असून, कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे. सोमवार, १२ जुन रोजी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्हाभरात करण्यात आलेल्या ४४९ चाचण्यांमध्ये केवळ एक पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ४३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी ११९ आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये अकोला मनपा क्षेत्रातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित ११८ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. रविवारी दिवसभरात ३३० रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यांचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून, यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.
आणखी दोघांची कोरोनावर मात
हॉटेल इंद्रप्रस्थ येथील एक व आयकॉन हॉस्पिटल येथील एक अशा दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ५५,६८९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी ५६, ५१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. १,१३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.