Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू; १५१ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 18:50 IST2021-06-06T18:50:17+5:302021-06-06T18:50:25+5:30
Corona Cases in Akola: ६ जून रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १,१०२ वर पोहोचला आहे.

Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू; १५१ पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख घसरत असून, रविवार, ६ जून रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १,१०२ वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ११५, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये ३६ असे एकूण १५१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ५६,६२२ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९२७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८१२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी अकोट तालुक्यातील जितापूर येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास २६ मे रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
तालुकानिहाय रुग्णसंख्या (आरटीपीसीआर)
मुर्तिजापुर-१०, अकोट-४३, बाळापूर-पाच, बार्शीटाकळी- दोन, पातूर-एक, तेल्हारा-आठ अकोला-४६. (अकोला ग्रामीण-सहा, अकोला मनपा क्षेत्र-४०)
१,१६२ रॅपिड चाचण्यांमध्ये ३६ पॉझिटिव्ह
शनिवार, ५ जून रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी १,१६२ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये केवळ ३६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
४१० कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नऊ, खासगी रुग्णालये व कोविड केअर सेंटरमधील २९, तरहोम आयसोलेशन मधील ३८० अशा एकूण ४१० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
२,७७६ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५६,६२२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५२,७८४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१०२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत २,७७६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.